
“गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही”
वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 08 जुलै 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील नागपुर ते वर्धा रोडवर, ग्राम पंचायत नालवाडी समोर वर्धा येथे सापळा रचुन एका पांढ-या रंगाची किया सेल्टोस कार क्र. एम.एच. 32 ए.एच.6986 वर एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपी 1) अमिर नसिब खा पठाण, वय 30 वर्ष, रा. इंदिरा झोपडपट्टी आर्वी नाका वर्धा, 2) सुरज राजु चव्हाण, वय 20 वर्ष, रा. मनकापुर अयोध्या उ.प्र. ह.मु. शिवनगर वर्धा 3) कल्याणी प्रकाश निकोसे, वय 18 वर्ष, रा. मनिष नगर नागपुर 4) उत्कर्षा ज्ञानेश्वर किरणाके, वय 19 वर्ष, रा. मनिष नगर नागपुर हे मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थांची वाहतुक करतांना मिळुन आले असुन, सदर गांजाचा माल हा आरोपी अमिर पठाण त्याचे साथीदार तौसिफ बेग व छन्ना या टोपननावाने ओळखला जाणारा ईसम यांचे मालकिचा असुन, ते तिघे मिळुन गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असुन, सुरज चव्हाण, कल्याणी निकोसे व उत्कर्षा किरणाके असे महिना पगारावर त्याचेकडे गांजा मालाची वाहतूक करण्याचे काम करीत असुन, सदर गांजाचा माल त्यांनी मदन सा नावाचा ईसम रा. काटापंजी ओडिसा राज्य यांचेकडुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, नमुद आरोपी हे संगणमताने गांजा मालाची तस्करी करून विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन 21 किलो 488 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, कारसह जु.किं. 22,37,200 रू चा मुद्देमाल जप्त करून एकूण 07 आरोपींविरुद्ध पो.स्टे. वर्धा शहर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सिनूकुमार बानोत, पो.अं मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, रवि पुरोहित, सागर भोसले, अक्षय राऊत, अनूप कावळे, अभिषेक नाईक, विनोद कापसे, हर्षल सोनटक्के, स्मिता महाजन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.