मागील काळात स्वतः बलात्काराच्या गुन्ह्यात खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात एका परिवाराला उध्वस्त करणारा हा गुन्हेगार आता लोकांना शिकवतो ज्ञान..

प्रशासन आणि पत्रकारितेच्या आडोशाखाली सुरू असलेला सावळा गोंधळ: मंगेश चोरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे व आरोपांचे वास्तव
वर्धा जिल्हा –
पत्रकारितेचा पवित्र व चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या क्षेत्राला कलंक लावणारे प्रकार वर्धा जिल्ह्यात सातत्याने समोर येत आहेत. यात स्वयंघोषित ‘पाटील’ म्हणून मिरवणारे मंगेश चोरे यांचे नाव पुन्हा एकदा आघाडीवर आले आहे. लोकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे आणि इतरांवर गंभीर आरोप करणारे चोरे यांच्या स्वतःच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील कारनाम्यांवर आता सर्वसामान्य जनतेतून आणि प्रशासकीय पातळीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गंभीर गुन्हे
लोकांवर मनमानी पद्धतीने बलात्कारासारखे गंभीर आरोप करणाऱ्या मंग्या उर्फ मंगेश चोरे यांच्यावर यापूर्वीच खरागणा पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या मुलीने मंग्याला राखी बांधली तिचेच शारीरिक शोषण केलाचा त्या पिढीने अखेर त्रस्त होऊन बलात्कार गुन्हा दाखल झालेला आहे. हा इतिहास दडपून ते इतरांना नैतिकता शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, त्या कालावधीत तत्कालीन पोलीस अधीक्षक महोदयांवर (दोरजे मॅडम) विविध निराधार लांछन लावून पोलीस यंत्रणेला आणि कार्यप्रणालीला बदनाम करण्याचे कुत्सित प्रयत्न या व्यक्तीने केल्याचे रेकॉर्डवर आहे. सध्याच्या काळातही अशाच पद्धतीचे दिशाभूल करणारे प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. सूत्रांच्या माहितीनुसार, या स्वयंघोषित पाटलावर नागपूर ते यवतमाळ पट्ट्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये मिळून तब्बल २३ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
रेती घाटाच्या नावाखाली अवैध वसुलीचे आरोप
केवळ ब्लॅकमेलिंग किंवा बदनामी नाही, तर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक गंभीर आरोप यांच्यावर आहेत. हल्लीच्या काळात रेती घाटांच्या नावाखाली सर्वसामान्य व व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच ते सहा लाख रुपयांची वसुली करून स्वतःची तुंबडी भरण्याचे उद्योग सुरू असल्याचा संतापजनक प्रकार चर्चाconstrained आहे. … एवढेच नाही तर पत्रकारांचे सेटलमेंट करण्यासाठी सुद्धा याने तांदूळ व्यापाऱ्यांकडून पाच लाख रुपये घेतले आहे ते सुद्धा स्वतःच हडप केले. स्वतःवर दाखल असलेल्या २३ गुन्ह्यांबाबत ‘हे सर्व बुद्धीप्रणित आणि राजकीय द्वेषतून लावले आहेत’ असा बचावात्मक पवित्रा ते घेत असले, तरी कोणत्याही निर्दोष व्यक्तीला विनाकारण गुन्ह्यांमध्ये अडकवून वेळ वाया घालवण्याचा आनंद कोणालाही होत नाही, अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. केलेल्या कृत्यांचे व पापांचे प्रायश्चित्त कायद्याच्या चौकटीत राहून भोगावेच लागेल, हे निश्चित मानले जात आहे.
प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाची भूमिका
मागील अनेक काळापासून सुरू असलेल्या या प्रकारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे बोलले जाते. मृत व्यक्तींच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे प्रकार करणाऱ्या अशा प्रवृत्तींमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील पत्रकारिता आणि सामाजिक वातावरण मलीन होत आहे. त्यामुळे आता वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अशा स्वयंघोषित भामट्याची व गुन्हेगारी प्रवृत्तीची कठोर कानउघाडणी करावी आणि तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे.