
सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचा मोठे गभाड: वर्धा येथील सार्वजनिक बांधकाम अभियंता एकनाथ टिकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर!
वर्धा:
वर्धा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले हे आपल्या कारभारामुळे आणि विविध वादांमुळे सतत चर्चेत व वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. आर्थिक मलिदा लाटणे, कंत्राटदारांची बिले काढताना मनमानी कारभार करणे आणि टक्केवारीचा हिशोब ठेवणे यांसारख्या गंभीर आरोपांमुळे ते आता अडचणीत आले आहेत.तक्रारदार पीडित व्यक्तीने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्या संपत्तीची खुली चौकशी सुरू केली असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
प्रकरणाची प्रमुख वैशिष्ट्ये व घडामोडी
तक्रारीची गंभीर दखल: तक्रारदार च्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) केलेल्या रीतसर तक्रारीनंतर ही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मालमत्तेची चौकशी व जबाब नोंदणी: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील ५ ते ६ दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा अभियंता एकनाथ टिकले यांना कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी केली असून त्यांचा जबाब नोंदवीला आला असून. त्यांच्या त्याच्यात अधिक संपत्ती जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कंत्राटदारांचे शोषण व आरोप: कोट्यवधी रुपयांच्या बिलांच्या मोबदल्यात टक्केवारीची वसुली करणे आणि त्यातून कंत्राटदारांना वेठीस धरल्याचे आरोप नागरिकांमधून व कंत्राटदारांमधून होत आहेत. या मनस्तापातून काही कंत्राटदारांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागल्याची चर्चा वर्धा शहरात आहे.
लोकांमध्ये चर्चेचा विषय: “सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘नात’ आता लवकरच अनाथ होणार का?” अशी चर्चा सध्या वर्धा जिल्ह्यात रंगली असून, इतक्या अल्पावधीत आणि वादग्रस्त कार्यकाळात एवढी अफाट संपत्ती आली कुठून, असा संतप्त सवाल वर्धेकर नागरिक उपस्थित करत आहेत.
पुढील संभाव्य कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या एकनाथ टिकले यांच्या संपत्तीचा सखोल हिशोब आणि कागदपत्रांची पडताळणी करत आहे. जर चौकशीत बेहिशोबी संपत्ती किंवा लाचखोरीचे पुरावे निष्पन्न झाले, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सततच्या वादांमुळे आधीच अडचणीत आलेले टिकले आता या चौकशीनंतर कायदेशीर कारवाईच्या फेऱ्यात अडकल्यामुळे घरवापसी किंवा निलंबनाच्या छायेखाली असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया: शासकीय पदाचा गैरवापर करून जनतेच्या व कंत्राटदारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून शासकीय विभागात पारदर्शकता येईल.