
वर्धा पाटबंधारे विभाग वर्धा या सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता नीतू चव्हाण यांच्या कारभारावर गंभीर आरोप; शासकीय वाहनाने दररोज नागपूर -वर्धा -नागपूर प्रवासाची तसेच वर्धा येथील बदलीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागात चंद्रपूर येथे कार्यरत कुप्रसिद्ध अधीक्षक अभियंता (नातेवाईक ) यांच्या मदतीने राजकीय दारात वाटलेल्या 70 किलो व वर्धा येथील दोन कुप्रसिध्द कंत्राटदार यांच्या मदतीने शासकीय दारात वाटलेल्या 30 किलो मिठाई ची शहरात जोरदार चर्चा!
नागपूर:
जलसंपदा विभागातील वर्धा पाटबंधारे विभाग वर्धा येथे कार्यरत सिंचन विभागाच्या वर्धा येथील कार्यकारी अभियंता नीतू चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर आणि कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बदली साठी वाटलेल्या मिठाई ची भरपाई सद्यास्थितीत या विभागातर्गत बांधकामची कामे करणाऱ्या कंत्राटदाराकडणु कार्यकारी अभियंता नितु चौहान करीत आहे (त्या दोन कुप्रसिद्ध कंत्राटदारांना यातून सूट देण्यात आली आहे )जो कंत्राटदार या भरपाईत योगदान देत नाही त्याचे देयक थांबाविण्यात येते या कामात त्यांचे अत्यंत जवळचे व विश्वासपात्र निविदा लिपिक महत्वाची भूमिका बजावतात. कंत्राटदारांना मॅडम सतत अनुपस्थित असल्यामुळे त्यांच्या नागपूर येथील अड्डयावर जावून मिठाई भुर्दंड जमा केला की विश्वासू निविदा लिपिक अत्यंत तत्परतेने पुढील कार्यवाही पूर्ण करतात.
या प्रकरणाचे पुरावे काही कंत्राटदार यांनी जमा केले असून ते मा. पालकमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याची जोरदार चर्चा असून, यामुळे सिंचन वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण कंत्राटदार वर्ग यामुळे हैराण, परेशान, झालेला आहे.
काही कंत्राटदार यांनी मिठाई भुर्दंडात योगदान देण्यास नकार देऊन तक्रारीची भाषा वापरली तर त्यांना मॅडम यांनी 70 किलो मिठाई वाटून येथे आली आहे त्यामुळे माझं काहीच बिघडणार नाही व कोणीच माझं काहीच करू शकणार नाही असा सज्जड दम त्यांना दिला गेला.
शासकीय वाहन गैरवापर बाबत प्रश्न उपस्थित केल्यास वरील 70 किलो मिठाई चा दम दाखविण्यात येतो.
प्रमुख मुद्दे व वादाच्या भोवऱ्यातील बाबी:
वर्धा येथे या महत्त्वाच्या पदावर रुजू होण्यासाठी तब्बल ७० किलो मिठाई देऊन ही बदली करून घेतल्याची चर्चा सध्या शहरात सर्वत्र सुरू आहे.
माहिती अधिकारातील माहिती विरुद्ध वास्तव्य: माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या अर्जाला उत्तर देताना नीतू चव्हाण यांनी आपण वर्धा येथेच निवासी असून नागपूरहून ये-जा करत नसल्याचे लेखी दिले आहे.
फास्टॅग रेकॉर्डचा पर्दाफाश: कागदोपत्री वर्धा निवासी असल्याचे सांगितले जात असले, तरी शासकीय वाहनाच्या फास्टॅग (Fastag) रेकॉर्डनुसार सदर गाडीची नागपूर ते वर्धा दररोज नियमित ये-जा सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे “सत्य किती आणि बनवाबनवी किती?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये रोष आणि अनागोंदी कारभाराचा आरोप
स्वतः कार्यकारी अभियंताच साप्ताहत दोन किंवा 3 दिवस (म्हणजेच महिन्यातील फार फार तर आठ ते दहा दिवस )12:30 नंतर कार्यालयात येतात व 4:30 ते 5:15 पर्यंत नागपूरला स्वघरी निघून जातात त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची चांदी झालेली आहे.
त्यांना ही एकप्रकारे लॉटरी लागल्यासारखी आहे परंतु यात बिचारा शेतकरी भरडल्या जात आहे.
एका बाजूला सिंचन विभागाकडून शेतकऱ्यांच्या पाणी आणि सिंचनाशी संबंधित प्रश्न प्रलंबित राहत असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आणि कमिशनखोरीचे गंभीर आरोप होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय वाहनाचा असा वैयक्तिक वापरासाठी आणि दररोजच्या प्रवासासाठी होणारा वापर चव्हाट्यावर आला आहे.
पुढील कारवाईचे आव्हान
एकीकडे पुराव्यांचे दावे आणि दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर होत असलेली कथित दस्तऐवजांची फेरफार, यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. आता वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आणि अनागोंदी कारभारावर काय कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण नागपूर आणि वर्धा परिसराचे लक्ष लागले आहे.