
खंडणीबहाद्दर भामट्या ‘मंगेश चोरे’ अखेर गजाआड.! पोलिसांनी NBW च्या आदेशानुसार घेतले ताब्यात
वर्धा : – सेलू पोलीस ठाण्यातील अप.क्र. ५/२०२३, कलम ३८१, ४१३, ३४ भादंवि या गुन्ह्यातील आरोपी मंगेश विठ्ठल चोरे, रा. नेरी पुनर्वसन, सालोड याला मा. जेएमएफसी न्यायालय, सेलू यांच्या अजामीनपात्र वॉरंटच्या (NBW) आदेशावरून पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेलू पोलिसांनी मंगेश चोरे याला काल रात्री ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत चोरी, खंडणीसह गंभीर स्वरूपाचे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या कारवाईकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मंगेश चोरे याच्याविरुद्ध सेलू, सावंगी (मेघे), वर्धा शहर, रामनगर आणि सेवाग्राम पोलीस ठाण्यांत विविध कलमांनुसार गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. उपलब्ध कागदपत्रांमध्ये चोरी, फसवणूक, मारहाण, धमकी तसेच खंडणीसंबंधीच्या कलमांचा समावेश आहे.
आज न्यायालयात हजर करणार.!
दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. आज मंगेश चोरे याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालय आरोपीला पोलीस कोठडी देते की न्यायालयीन कोठडी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या या आरोपीवरील कारवाईचा पुढील तपास कोणत्या दिशेने जातो आणि आणखी काही प्रकरणे उघडकीस येतात का, याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.