सेलू पोलिसांचे नागरिकांना आव्हान याचे विरोधात कुठली तक्रार असल्यास न घाबरता दिलेल्या नंबरशी संपर्क साधा

सेलू पोलीस स्टेशनची मोठी कारवाई; खंडणी उकळणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गुन्हा दाखल
सेलू (वर्षा):
फिर्यादी व त्यांच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी देऊन, खोट्या व निराधार बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या एकावर पोलीस स्टेशन सेलू येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश विठ्ठलराव चोरे (रा. नेरी पुनर्वसन, सालोड, ता.जि.वर्षा) असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सेलू येथे येऊन तक्रार दिली की, आरोपी मंगेश चोरे हा त्यांना व त्यांच्या मित्राला मारहाण व मर्डर करण्याची तसेच बदनामीची भीती दाखवून पैशांची मागणी करत होता. तो अवैध व्यवसाय करत असल्याचे व खोट्या-निराधार बातम्या सोशल मीडियावर व वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने फिर्यादी यांनी घाबरून आरोपीला ५० हजार रुपये दिले होते. त्यानंतरही आरोपी आणखी पैशांची मागणी करत होता व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची आणि कुटुंबाची समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी उकळत होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून भा.न्या. संहिते २०२३ चे कलम ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीवर पूर्वसुची व इतर गुन्हे
सदर आरोपीवर यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये डिझेल चोरी, खंडणी मागणे, फसवणूक केल्याबाबत अनेक गुन्हे नोंद आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सेलू पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर आरोपीबाबत काही तक्रार असल्यास पोलीस स्टेशन सेलू येथे येऊन तक्रार द्यावी किंवा खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा:
स.पो.नि. पंकज वाघोडे (ठाणेदार पो.स्टे. सेलू): ७३०४२१०७२४
पो.उपनि. उमेश उगले: ९०४९३९४०३५
पोलिस अमलदार अनिल केकतपुरे: ९९२१००७३२३
पोलिस अमलदार रामकिसन इप्पर: ९८२३५१८५८२
पोलिस अमलदार गजानन कामठाणे: ९८३४६६२८४६
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन सेलूचे ठाणेदार स.पो.नि. पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनात पो.उपनि. उमेश उगले करीत आहेत.