
आष्टी शहरात भारत गॅस सिलेंडरचा तुटवडा
*एजन्सी वाला म्हणतो *कंपनीकडून सिलेंडर पुरवठा होत नाही
*सिलेंडर पुरवठ्याकडे तहसीलदाराचे दुर्लक्ष
*शहरात व तालुक्यात तील ग्राहकांना 50 ते 60 दिवस सिलेंडर मिळेल याला जबाबदार कोण
आष्टी शहीद:-मागील दोन महिन्यापासून युद्ध सुरू असल्याचा परिणाम आष्टी शहरातील व तालुक्यातील भारत गॅस सिलेंडरच्या ग्राहकांवर पडलेला आहे.
आष्टी शहर व तालुक्यामध्ये भारत गॅस एजन्सी एकच असल्याने मोठ्या प्रमाणात भारत गॅस एजन्सी चे ग्राहक असल्याने हे सर्व ग्राहक भारत गॅस एजन्सीवर अवलंबून आहे या ग्राहकांकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने व सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त आष्टी तालुक्याच्या ठिकाणी भारत गॅस एजन्सी असून या एजन्सी मार्फत शहरासह तालुक्यात गॅस सिलेंडरचा पुरवठा ग्राहकांना केल्या जाते मात्र गेल्या दोन महिन्या पासून युद्ध सुरू असल्याने या युद्धाचे पडसाद एलपीजी गॅस सिलेंडर वर होत असल्याची दिसून आले इथपर्यंत ही बाब असली तरी ग्राहकांना 35 दिवसानंतर सिलेंडर मिळेल असे शासनाने नियम काढला मात्र अनेक ग्राहकांनी 35 दिवस बुकिंग करून पूर्ण होऊ नही त्यांना सिलेंडर प्राप्त होत नसल्याने सिलेंडर ग्राहकावर उपासमारीची पाळी आली आहे एजन्सी मालकाकडे सिलेंडर बाबत मागणी केली असता गाडीचं आली नाही याचे कारण दाखवून सिलेंडर ग्राहक आल्या पावली परत जात आहे. या संदर्भात तहसीलदार आष्टी यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता तहसीलदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशा दुर्लक्षित तहसीलदारा बाबत नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तहसीलदार ऐश्वर्या गिरी ह्या नियमित वेळेवर तहसील कार्यालय येथे हजर राहत नसल्याने जाणाऱ्या तक्रारदाराला गेल्या पावली परत यावे लागते व या जीवनावश्यक गरजेच्या वस्तूवर तहसीलदाराचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्याने नसल्याने पर्यायी उपाय म्हणून ग्राहकांनी कशावर स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न गृहणीसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्राहकांमध्ये गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सी वर रोष निर्माण करत आहे.
प्रतिक्रिया
१) श्रीमती वरठी पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय आष्टी
तालुक्यात भारत गॅस तू थोड्याबाबत अनुसया गॅस एजन्सी धारकांनी तहसील कार्यालय येथे तक्रार दिली की भारत गॅस कंपनीकडून पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना शहरात व तालुक्यात सिलेंडर देणे अवघड झाले आहे त्या अनुषंगाने कंपनी एजंटला दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क झालेला नाही लवकरात लवकर कारवाई करतील.
२) प्रतीक दाभे:-यांच्याशी संपर्क साधला असता पैसे भरूनही गॅस सिलेंडरचा पुरवठा कंपनीकडून होत नसल्याने ग्राहकांना सिलेंडर देणे कठीण झाले आहे. तसेच 35 ते 45 दिवसाचे बुकिंग निकष आल्याने पुरवठा कमी होत आहे.
मुख्य संपादक स्काय न्यूज लाईव्ह ऑनलाईन
मुख्य संपादक निलेश पिंजरकर
स्काय न्यूज लाईव्ह ऑनलाईन