
वर्धा:पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी उकळणे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरणे, असे प्रकार सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. यातच ‘एका हिंदी दैनिका चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी संजय ओझा उर्फ ‘लकवा मॅन’ यांचे अनधिकृत बांधकाम आता प्रशासनाच्या रडारवर आले असून, नगरपरिषदेने त्यांना बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संजय ओझा यांनी गेल्या काही काळापासून वर्धा नगरपरिषदेच्या विरोधात सातत्याने नकारात्मक आणि बिनबुडाच्या बातम्या प्रकाशित करून अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या बातम्यांमागे जनहित नसून ५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा मनसुबा असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या या मागणीमुळे आणि दबावाच्या राजकारणामुळे त्रस्त झालेल्या प्रशासनाने अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.
तपासात अनधिकृत बांधकामाचा उलगडा
नगरपरिषद प्रशासनाने जेव्हा संजय ओझा यांच्या मालमत्तेची आणि कागदपत्रांची पडताळणी केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. ओझा यांच्या घराचे बांधकाम हे पूर्णतः अवैध आणि अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या या बांधकामाबाबत नगरपरिषदेने आता कठोर पाऊले उचलली आहेत.
प्रशासकीय कारवाईचा बडगा
नगरपरिषदेने अधिकृतपणे संजय ओझा यांच्या घरावर नोटीस चिकटवून त्यांना त्यांचे अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. खंडणी मागण्याच्या आरोपांनंतर आता प्रत्यक्ष कारवाईची नोटीस आल्याने ‘लकवा मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
”प्रशासनावर दबाव टाकून वैयक्तिक स्वार्थ साधणाऱ्यांवर ही चपराक मानली जात आहे. कायद्यासमोर सर्व समान असून, अनधिकृत बांधकामावर नियमानुसार कारवाई केली जाईल.”
— नगरपरिषद प्रशासन सूत्र
वर्धावासीयांचे लक्ष कारवाईकडे
पत्रकारितेचा बुरखा ओढून अनधिकृत कृत्ये करणाऱ्या या कथित पत्रकाराचे बांधकाम प्रशासन कधी जमीनदोस्त करणार, याकडे आता संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे वर्धा येथील पत्रकारिता क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून, खऱ्या आणि प्रामाणिक पत्रकारांकडून अशा खंडणीखोरांचा निषेध केला जात आ
मुख्य संपादक निलेश पिंजरकर
स्काय न्यूज लाईव्ह ऑनलाइन
