
मुख्य संपादक निलेश पिंजरकर
स्काय न्यूज ऑनलाईन
आज हिंगणघाट आगाराला नवीन चार लालपरी बसेस प्राप्त झाल्या असून त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
याच कार्यक्रमादरम्यान अनेक दिवसांपासून नागरिकांची असलेली मागणी लक्षात घेता विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आजनसरा येथे नागपूर ते आजनसरा नियमित बससेवा सुरू करावी अशा सूचना यावेळी दिल्या. माझ्या या सूचनेला त्वरित प्रतिसाद देत एक बस भाविक भक्तांसोबत हिरवा झेंडा दाखवत नियमित सेवेसाठी रवाना करण्यात आली, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
भाविकांना आता दर्शनासाठी सोयीस्कर आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच, यावेळी मासिक सत्काराच्या निमित्ताने उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या समर्पित सेवेमुळेच प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होत आहेत. याप्रसंगी नगरपालिका बांधकाम सभापती चंद्रकांत मावळे, नगरसेवक सोनू गवळी, नगरसेवक अतुल नंदागवळी, नगरसेवक रोहीत हांडे,देवा पडोळे, डॉ विजय पर्बत,विभागिय आगार व्यवस्थापक स्वाती तांबे, आगार व्यवस्थापक गौतम शेंडे व सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
और
