श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराचा रक्तदान उपक्रम
वर्ध्यात शिवजयंतीनिमित्त १०१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
निलेश पिंजरकर/ वर्धा: वर्ध्यात शिवजयंती निमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराच्या वतीने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरात तब्बल १०१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. शिवजयंती उत्सव साजरा करताना समाजहिताचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. शिबिराचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र परिवाराचे प्रमुख दिपक चुट्टे आणि सचिन खंडारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी नियोजन, व्यवस्थापन आणि रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सक्रिय सहकार्य केले. रक्तदान हेच खरे जीवनदान असल्याचा संदेश देत या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहेय.