
वर्ध्यात काँग्रेस पक्षाला स्वतःच्याच नेत्याकडून मोठा दगाफटका झालाय!
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या नेत्याच्या विश्वासाला तडा गेलाय. ज्या शैलेश अग्रवाल यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्याच शिफारशीने वर्धा जिल्ह्याच्या विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं होतं… त्याच किसान सेलचे अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेस पाठीत खंजीर खुपसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे!”
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश अग्रवाल यांनी पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना किंवा सूचना न देता, थेट विधान परिषदेचा आपला नामांकन अर्ज मागे घेतला! अग्रवाल यांच्या या धक्कादायक पावलामुळे भाजप उमेदवाराचा मार्ग सुकर झाला असून, त्यांनी एकप्रकारे भाजप उमेदवाराला जिंकण्यास थेट मदत केल्याचं आता उघड झालंय.”
“या महाभयंकर दगाफटक्याची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, काँग्रेसने तात्काळ मोठी कारवाई केली आहे. शैलेश अग्रवाल यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांना निलंबित करण्यात आलं आहे! एवढंच नाही, तर या संपूर्ण प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.”
“पण… ऐनवेळी अर्ज मागे घेण्यामागचं नेमकं कारण काय? या संपूर्ण प्रकरणामागे पडद्याआड मोठं ‘अर्थकारण’ शिजलंय का? संपूर्ण वर्धा जिल्ह्यात सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण’ !
मोठ्या रक्कमेच्या व्यवहारातूनच हा दगाफटका झाल्याची चर्चा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आहे. जनतेमधील आणि राजकीय वर्तुळातील याच संशयाची दखल घेत, काँग्रेस पक्षाने आज एक अधिकृत पत्र जारी केलं आणि अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी केली.
आता यामागे नक्की कितीची डील झाली? भाजपच्या कोणत्या नेत्यांशी संधान साधलं गेलं? आणि काँग्रेसच्या या कारवाईनंतर शैलेश अग्रवाल यांची पुढची भूमिका काय असणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.”