
दुर्गंधी व प्रदूषणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
डेपो हटवा किंवा गावाचे पुनर्वसन करा – नागरिकांची मागणी
अँकर – वर्ध्याच्या इझापुर परिसरात कचरा डेपोच्या त्रासामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. आज संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून कचरा डेपोमध्ये जाणाऱ्या गाड्या अडवत आंदोलन सुरू केले. दुर्गंधी, धूर आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहेय.
व्हीओ – इझापुर येथील कचरा डेपोमध्ये वर्धा शहरासह परिसरातील तब्बल 12 गावांचा कचरा टाकला जातो. मात्र, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. त्यातच कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर आणि प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून आपला रोष व्यक्त केला. जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
फायनल व्हीओ – दरम्यान, कचरा डेपो हटविणे किंवा इझापुर गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या आंदोलनानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेय.
