
*शेतकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला*
पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला गतीमान करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या हिताचे बजेट सादर केले आहे. राज्याच्या या बजेटमुळे राज्य आणखी गतीमान होईल. शेतकरी बांधवांना दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे मोठी घोषणा सरकारने केली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी श्री.फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर व्यक्त केली.
विदर्भात हरितक्रांती आणणारा वैनगंगा – नळगंगा प्रकल्पासह राज्यातील अन्य नदी जोड प्रकल्पांना मंजूरी देण्यासोबतच आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. नळगंगा – वैनगंगा प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 4 लाख हेक्टर भूमी सिंचनाखाली येणार आहे. तथापि, विदर्भ सुजलाम सुफलाम होणार आहे. या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील सुमारे 60 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
लाडकी बहिण योजना प्रभावीपणे सुरू ठेवणे, महिला सक्षमीकरण, कृषि व जलसंपदा भरीव तरतूद, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड, पायाभूत सुविधांचा गतिमान विकास, शाळांना अनुदान, आरोग्य केंद्रे डिजीटल करण्याची तरतूदीसह अन्य योजना सुरू करण्यात आल्या आहे.
अमरावती येथे बनणार डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल
डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे अमरावती येथे डॉ.पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाची निर्मिती होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज बजेटमध्ये ही घोषणा केली आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा व संशोधनवृत्ती वाढावी यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
डॉ.पंकज भोयर
राज्यमंत्री, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म तथा पालकमंत्री वर्धा व भंडारा
००००